महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फेसबुकवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट ; लातुरात बसवर दगडफेक - offensive post in latur

पोलिसांच्या म्हणण्यासुर एका तरुणाचे फेसबुक अकॉउंट हॅक करून त्याच्या मित्रांनीच ही पोस्ट टाकत तरुणावर सूड उगवण्याचा प्रयत्न केला आहे.

खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

By

Published : Jul 27, 2019, 8:56 PM IST

लातूर- शहारातील एका तरुणाने शनिवारी फेसबुकवर महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकली. या पोस्टमधील आक्षेपार्ह चित्रांमुळे लातूर शहरात तणाव निर्माण झाला होता. विवेकानंद चौकात एका बसवर दगडफेकही झाली. पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत पाच तरुणांना ताब्यात घेतले आहे.

खबरदारी म्हणून शहरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

पोलिसांच्या म्हणण्यासुर एका तरुणाचे फेसबुक अकॉउंट हॅक करून त्याच्या मित्रांनीच ही पोस्ट टाकत तरुणावर सूड उगवण्याचा प्रयत्न केला आहे. ही पोस्ट फेसबुकवर टाकण्यात आल्यानंतर शहरातील तरुणांमध्ये संताप निर्माण झाला आणि दुपारी तरुणांचे गट रस्त्यावर उतरले. मात्र, तोपर्यंत पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याने शांतता राखण्यात यश मिळाले.

पोलीस आता या घटनेची कसून चौकशी करीत असून शहरातील मुख्य रस्त्यांवर खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लातूर शहरातल्या विवेकानंद चौक परिसरात एका एस.टी बसेसवर संतप्त तरुणांनी दगडफेक केल्याची घटना वगळता शहरात शांतता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details