महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरमध्ये नऊ पोती गांजा जप्त; वाढवना पोलिसांची कारवाई - वाढवना पोलीस लातूर बातमी

अहमदपूरहुन उदगीरकडे एका चारचाकीत अवैध गांजाची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी या वाहनाचा पाठलाग करून हाळी ते सुकणी गावाच्या दरम्यान चारचाकी ताब्यात घेतली असता 9 पोत्यांमध्ये तब्बल 17 लाखाचा गांजा सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

वाढवना पोलीसांची कारवाई
वाढवना पोलीसांची कारवाई

By

Published : Oct 9, 2020, 5:24 PM IST

लातूर - जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील हाळी ते सुकणी दरम्यानच्या मार्गावर गुरुवारी रात्री 9 पोते गांजा जप्त करण्यात आला आहे. एका गाडीतून गांजाची वाहतूक केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून वाढवना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

उदगीर तालुक्यातील हाळीजवळ एका चारचाकीतून गांजाची वाहतूक केली जात असल्याची माहिती वाढवना पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वाहनाचा पाठलाग करत असताना हाळी ते सुकणी गावाच्या दरम्यान पोलिसांनी गाडी ताब्यात घेतली असता यामध्ये 9 पोत्यांमध्ये तब्बल 17 लाखाचा गांजा सापडला आहे. अहमदपूरहुन उदगीरकडे बोलेरो (एपी. 28 बीएच 0108) या चारचाकीत याची वाहतूक केली जात होती. चारचाकीतील तिघांना पोलिसांनी अटक केली असून एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.

कर्नाटक लगतच्या सीमेवर अशाप्रकारे गांजाची वाहतूक सातत्याने होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील, नायब तहसीलदार राजाभाऊ खरात, सपोनि बाळासाहेब नरवटे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. मात्र, या गांजाची वाहतूक कुठे केली जात होती याचा तपास पोलीस करीत आहेत. याप्रकरणी तिघांसह गांजा वाहतूक करणारी चारचाकीही ताब्यात घेण्यात आली आहे.

हेही वाचा -अभियंत्याला खड्ड्यात बसवून मनसेचे महामार्गावर 'झोपा काढो' आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details