लातूर - बेकायदा वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी व ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी दीड लाखांची लाच स्विकारताना (Nilanga Tehsildar Bribe Accept) निलंगा तहसीलचे विद्यमान तहसीलदार गणेश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. लातूरच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन ही कारवाई केली आहे.
Nilanga Tehsildar Bribe Accept : निलंग्याचे तहसिलदार गणेश जाधव दीड लाखाची लाच घेताना 'एसीबी'च्या जाळ्यात - लाच घेताना निलंगा तहसिलदार अटकेत
बेकायदा वाळूच्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी व ट्रक नियमितपणे चालू देण्यासाठी दीड लाखांची लाच स्विकारताना (Nilanga Tehsildar Bribe Accept) निलंगा तहसीलचे विद्यमान तहसीलदार गणेश जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दीड लाखाची लाच घेताना अटक - लातूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाकडे मागील 25 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार 26, 28, 30, 31 मे अशा चार दिवस लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली होती. एकुण एक लाख 80 हजारांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती एक लाख पन्नास हजार देण्याचे ठरले होते. यातील आरोपी लोकसेवक तहसिलदार गणेश जाधव व एजंट रमेश मोगेरगे यांनी तक्रारदार यांना वाळूच्या तीन ट्रक नियमितपणे चालवू देण्यासाठी व वाळूच्या ट्रकवर या पुढे कारवाई न करण्यासाठी प्रती ट्रक 30 हजार प्रमाणे दोन ट्रकचे 60 हजार रुपये प्रति महा असे मागील तीन महिन्याचे एक लाख 80 हजार रुपयांची प्रत्यक्ष लाच मागणी करून तडजोडी अंती एक लाख पन्नास हजार रुपये ठरवून खाजगी इसम (एजंट) रमेश मोगेरगे यांच्याकडे देण्यासाठी सांगितली. त्या प्रमाणे दि.4 जून रोजी खाजगी इसम (एजंट) रमेश मोगेरगे यांनी निलंगा येथे तहसीलदार यांचे घरासमोरच लाच मागणी केलेली रक्कम एक लाख पन्नास हजार रुपये पंचासमक्ष स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तहसिलदार गणेश जाधव व खाजगी एजंट या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ACB ची कारवाई - ही कारवाई नांदेड परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक डॉ. राजकुमार शिंदे , अप्पर पोलीस अधिक्षक धरमसिंग चव्हाण, लातूरचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधिक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपअधिक्षक पंडीत रेजितवाड करत आहेत.