लातूर - कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी एका रुग्णाची भर पडल्यानंतर गुरुवारी पुन्हा 6 रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 33 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
लातुरात कोरोनाचे 6 नवे रुग्ण; आकडा पोहोचला 33 वर, आजपासून जिल्हा अंतर्गत बससेवा होणार सुरू - लातूर कोरोना पॉझिटिव्ह
लातूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी एकाच दिवसात ६ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३३ वर पोहोचला आहे.
लॉकडाऊनच्या शिथिलतेनंतर परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत 40 हजारहून अधिक नागरिक हे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तर मुंबई- पुणे हुन परतणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. निलंगा तालुक्यातील कोराळी येथील रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोराळी सारख्या ग्रामीण भागात रुग्णांची संख्या ही 8 वर गेली आहे. त्यामुळे हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. येथील सर्व रुग्णांना निलंगा येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून नियमात बदल केले जात आहेत. मात्र, नागरिकांकडून नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.