महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर : माहिती अधिकाराखाली माहिती मागणाऱ्याची चाकूने भोकसून हत्या - BJP workers

माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली या कारणावरून निलंगा तालुक्यातील शिरोळ वंजारवाड्यात भर चौकात काँग्रेस कार्यकर्त्याने भाजप कार्यकर्त्याचा खून केला.

निलंगा उपजिल्हा रुग्णालया

By

Published : Jul 22, 2019, 2:08 PM IST

लातूर -माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितल्याच्या कारणावरून निलंगा तालुक्यातील शिरोळ वंजारवाड्यात भर चौकात काँग्रेस कार्यकर्त्याने भाजप कार्यकर्त्याचा खून केल्याची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शिरोळ वंजारवाड्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

निलंगा तालुक्यातील शिरोळ वंजारवाडा येथील बस स्थानकावर सोमवारी सकाळी राजेंद्र रघुनाथराव जाधव (वय, ३७) हे चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी सुरेश दिलीप जाधव याने पाठीमागून येऊन त्यांच्या पोटात चाकूने वार केले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी राजेंद्रला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाकूचे वार खोलवर गेल्याने राजेंद्र जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी निलंग्याकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

निलंगा उपजिल्हा रुग्णालया
राजेंद्र जाधव यांनी काही दिवसांपूर्वी माहितीच्या अधिकाराखाली ग्रामपंचायतीकडे विविध बाबींची माहिती मागितली होती. याचाच राग मनात धरून सरपंच विश्वास जाधव यांच्या पुतण्याने ही हत्या केल्याची चर्चा परिसरात होत आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. मृत राजेंद्र रघुनाथराव जाधव यांचे शवविच्छेदन निलंगा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात येत असून रुग्नालय परिसरात नागरिकांची गर्दी आहे. या घटनेतील आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details