महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

देशात आता मोदी विरोधात लाट - कुमार केतकर - loksabha

१९८५ नंतर एका पक्षाला मोदींच्या रुपाने स्पष्ट बहुमत मिळाले होते. आजची परिस्थिती संपूर्णपणे बदलली आहे. देशभरातील वातावरण मोदींच्या विरोधात आहे.

देशात आता मोदी विरोधात लाट : कुमार केतकर

By

Published : Apr 14, 2019, 8:24 AM IST

लातूर -राजकारणात चढउतार हे असतातच. भाजप सरकारने निव्वळ घोषणा करुन लोकांची फसवणूक केल्याची नागरिकांची भावना आहे. २०१४ सारखी परिस्थिती नाही. यामुळे देशभरातील वातावरण मोदींच्या विरोधात आहे, असे मत राज्यसभा सदस्य कुमार केतकर यांनी लातुरात व्यक्त केले.

देशात आता मोदी विरोधात लाट : कुमार केतकर

गेल्या पाच वर्षात मोदी सरकारने राजकारणाचा ढाचा बदलण्याचे काम केले. त्यातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अराजकता माजेल, त्यासाठी मोदी सरकारला लोकांनी बाजूला सारले पाहिजे. तरच राजकारणाचा ढाचा वळणावर येईल, असे केतकर म्हणाले. २०१९ ची लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आहे. १९८५ नंतर एका पक्षाला मोदींच्या रुपाने स्पष्ट बहुमत मिळाले होते. आजची परिस्थिती संपूर्णपणे बदलली आहे. देशभरातील वातावरण मोदींच्या विरोधात आहे. मोदींची विश्‍वासार्हता राहिली नाही. पुलवामा हल्ल्यावर काँग्रेस जे बोलत आहे, ते राष्ट्रविरोधी ठरवले जात आहे. वास्तविक सिक्युरिटी फोर्सला या हल्ल्याचा अंदाज कसा काय आला नाही, चौकशीत काहीच समोर आले नाही. सुरक्षेतील त्रुटीमुळे पुलवामासारख्या जीवघेणा हल्ला झालाच कसा, तरीही राष्ट्रीय प्रश्‍न बाजूला ठेवून वैयक्तिक आरोप केले जात असल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार अमित देशमुख, काँग्रेसचे सचिव संपतकुमार, अॅड. व्यंकट बेंद्रे, उदय गवारे, मोईज शेख आदी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details