महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेचे अहमदपुरात धरणे आंदोलन; प्रति हेक्टर ५० हजाराच्या मदतीची केली मागणी

जुलै महिना उलटला तरी खरिपाच्या पेरण्या रखडल्या असून बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजारांची मदत करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी अहमदपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेचे अहमदपुरात धरणे आंदोलन

By

Published : Jul 30, 2019, 5:38 PM IST

Updated : Jul 30, 2019, 5:46 PM IST

लातूर- पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. जुलै महिना उलटला तरी खरिपाच्या पेरण्या रखडल्या असून बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजारांची मदत करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी अहमदपूर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मनसेचे अहमदपुरात धरणे आंदोलन

हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हुलकावणी दिलेली आहे. शिवाय अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पावसाने उघडीप दिल्याने या क्षेत्रावरील पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तसेच नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. शिवाय दुष्काळी अनुदानापासून शेतकरी वंचित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली असून मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे.

यामुळेच मनसेच्यावतीने जिल्हाभर आंदोलने सुरु आहेत. तर आज अहमदपूर तहसील कार्यालयासमोर मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नृसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करण्याची मागणी करण्यात आली.

या आंदोलनाला तालुकाध्यक्ष भुजंग उगीले, शहराध्यक्ष डॉ. मिलिंद साबळे, संघटक माधव राठोड, शेतकरी सेने तालुकाध्यक्ष दिलीप पडिले आणि कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Last Updated : Jul 30, 2019, 5:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details