महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना साईड इफेक्ट : ३५ एकरातील द्राक्ष वावरातच, शेतकरी देशोधडीला - grape growing farmers loss

संचारबंदी आणि निर्यातीवर लादलेल्या निर्बंधामुळे औसा तालुक्यातील कारला गावच्या शेतकऱ्यांची 35 एक्करातील द्राक्ष बाग नासत आहे. हा माल चार दिवसात व्यापाऱ्यांनी घेतला नाही तर नुकसान अटळ आहे.

loss on laturs grape growing farmers
कोरोना साईड इफेक्ट : ३५ एकरातील द्राक्ष वावरातच, शेतकरी देशोधडीला

By

Published : Mar 27, 2020, 7:31 PM IST

लातूर -शेती व्यवसायात निसर्गाचे संकट कमी म्हणून की काय, आता या कोरोनाची भर पडली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या द्राक्षाच्या बागा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर नासत आहेत. सध्याची संचारबंदी आणि निर्यातीवर लादलेले निर्बंध यामुळे औसा तालुक्यातील कारला गावच्या ११ शेतकऱ्यांची ३५ एक्कारातील द्राक्ष अद्याप शेतामध्येच आहेत. ४ दिवसांत हा माल व्यापारी नाही घेऊन गेले तर कोट्यवधींचे नुकसान अटळ आहे.

कोरोना साईड इफेक्ट : ३५ एकरातील द्राक्ष वावरातच, शेतकरी देशोधडीला

जगभर कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रात बसत आहे. लॉक डाऊनच्या स्थितीत लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील कारला गावाच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तब्बल ७ कोटी रुपयांच्या निर्यात बंदीने फटका बसला आहे. जिल्ह्यातील किल्लारी परिसर निर्यातदार द्राक्ष उत्पादक म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्या लॉक डाऊन असल्याने सौदा होऊनदेखील व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कारण निर्यातच बंद असल्याने या द्राक्षाचे काय करणार, असा सवाल उपस्थित करीत आहेत. औसा तालुक्यातील कारला गावात ११ शेतकरी ३५ एकर क्षेत्रात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. किमान ७०० टन द्राक्ष तयार असून या द्राक्षाच्या निर्यातीसाठी आवश्यक तपासण्या झाल्या आहेत. मात्र, वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने निर्यातदार फिरकत नाहीत. यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याखाली असलेले द्राक्ष उत्पादक मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे बाग पोसण्यासाठी झालेला खर्च आणि संसार कसा चालवावा हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. राज्य शासनाने तातडीने द्राक्षा सारख्या नाशवंत मालाला निर्यातीसाठी आवश्यक सुविधा दिल्यास जगणं शक्य आहे, अन्यथा कर्जात मरण अटळ असल्याची भावना हे शेतकरी व्यक्त करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details