लातूर -जतना कर्फ्यू आणि संचारबंदी यामुळे गेल्या 12 दिवसांपासून जिल्ह्यातील दारू दुकाने आणि बीयरबार बंद आहेत. त्यामुळे तलफ भागविण्यासाठी तळीरामांनी चक्क बार फोडून दारू लंपास केल्याची घटना औराद शहाजनी येथे घडली आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दोन लाख ५८ हजार 410 रुपयांची दारू चोरीला गेली आहे.
दारूसाठी कायपण..! बार फोडून अडीच लाखाची दारू चोरीला - लातूर दारू चोरी
औराद शहजनी येथील शेळगी रोडवरील श्री वैभव बार आणि हॉटेलच्या गोडाऊनचे दार तोडून अडीच लाख रुपयांची विदेशी दारू चोरट्यांनी लंपास केली आहे. २१ मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत ही चोरी केली आहे.
औराद शहजनी येथील शेळगी रोडवरील श्री वैभव बार आणि हॉटेलच्या गोडाऊनचे दार तोडून अडीच लाख रुपयांची विदेशी दारू चोरट्यांनी लंपास केलेली आहे. २१ मार्च ते दोन एप्रिल या कालावधीत ही चोरी केलेली आहे. आज बार मालकाने पाहिले असता चोरीची घटना लक्षात आली. तसेच बारमधील आवश्यक असणारे रजिस्टर आणि इतर कागदपत्रे सुद्धा चोरीस गेले आहेत.
संबंधीत ठिकाणी औरादचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी तपासणी केली आहे. सर्वत्र पोलिसांची गस्त चालू आहे. अशा परिस्थितीत सुद्धा चोरट्यांनी विदेशी माल चोरून पोलिसांना आव्हान दिले आहे. यासंबंधी औराद पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गौड हे करीत आहेत.