लातूर - वीज अंगावर पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी दुपारी देवणीसह तालुक्यात पावसाच्या सरी बरसल्या, तर बोरोळ येथे विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. यामध्ये वीज अंगावर पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. बाजीराव नागप्पा म्हेत्रे (वय 65) असे त्यांचे नाव आहे.
वीज अंगावर पडून मेंढपाळाचा मृत्यू; देवणी तालुक्यातील घटना
म्हेत्रे हे मेंढ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी 4 च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजा कडाडू लागल्याने त्यांनी जवळच असलेल्या झाडाचा आसरा घेतला. मात्र, दुर्दैवाने वीज त्यांच्याच अंगावर पडली.
म्हेत्रे हे मेंढ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी 4 च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह विजा कडाडू लागल्याने त्यांनी जवळच असलेल्या झाडाचा आसरा घेतला. मात्र, दुर्दैवाने वीज त्यांच्याच अंगावर पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. पावसामुळे तालुक्यात अनेक भागात वीजपुरवठाही खंडित झाला आहे. बाजीराव म्हेत्रे यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे अधिकारी व पोलीस कर्मचारी घटस्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला. देवणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.