लातूर - जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून थंडीला सुरवात झाली आहे. मात्र, मंगळवारची पहाट लातूरकरांना वेगळाच आनंद देणारी ठरली. दिल्ली, जम्मू-काश्मिरप्रमाणे लातूरात देखील धुके पाहायला मिळाले. मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी या अल्हादायक वातावरणाचा आनंद घेतला. पहाटे सहा वाजल्यापासून हे धुके पडण्यास सुरवात झाली ते सकाळी ८ पर्यंत ते कायम होते.
हेही वाचा -नववर्षात 'या' चित्रपटांची असणार सिनेमागृहात वर्दळ
आठ दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून आज कमालीचा गारवा जाणवला. भल्या पहाटेच मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने समोर येणारा व्यक्तीही दिसण्यास अडसर निर्माण होत होता. दिवस उजाडला तरी वाहधारकांना गाडीची लाईट सुरू ठेऊनच मार्गस्थ व्हावे लागत होते. सकाळी व्यायमासाठी येणाऱ्या नागरिकांना या अल्हादायक वातावरणाचा लाभ घेतला, तर जो तो हे धुक्याचे चित्र मोबाईमध्ये टिपण्यास व्यस्त असल्याचे निदर्शनास आले. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांसाठी हे वातावरण पोषक असून खरीपातील तूरीवर मात्र याचा दुष्परिणाम होणार असल्याचा अंदाज वर्तीवला जात आहे.
हेही वाचा -राज्यातील खासगी शाळांमधून कला शिक्षक होणार कायमचे हद्दपार?