महाराष्ट्र

maharashtra

मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; शेती अन् पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

By

Published : Sep 16, 2020, 1:07 PM IST

लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी कायमच वणवण करावी लागते. बीड जिल्ह्याच्या हद्दीत असलेल्या मांजरा धरणावर लातूरकरांना अवलंबून रहावे लागते. यावर्षी मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून लातूरकरांचा पाणी प्रश्न मिटला आहे.

Manjra River
मांजरा नदी

लातूर -मांजरा धरणाच्या पाण्यावर लातूरकरांची तहान आणि शेती अवलंबून आहे. गेले तीन दिवस कळंब आणि केज तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दोन महिन्यांपूर्वी मृतसाठ्यात असलेल्या धरणात आता 73.701 दलघमी पाणीसाठा तयार झाला आहे. शिवाय नदीपात्रातही पाणीपातळी वाढल्याने शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्नही मिटला आहे.

मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ

मराठवाड्यात सर्वात कमी पाऊस लातूर जिल्ह्यात झाला आहे. मात्र, शहरासह येथील औद्योगिक वासाहतीला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण हे बीड जिल्ह्यातील केज तालुका हद्दीत आहे. गेले तीन दिवस कळंब आणि केज तालुक्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढला आहे. आणखी तीन ते चार दिवस पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदी पात्रालगत असलेला ऊसाचे अधिक उत्पन्न घेतले जाते. नदीमध्ये पाणी वाढल्याने या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्यावर्षी मांजरा धरण हे मृतसाठ्यात होते. यंदाही सुरुवातीच्या काळात पाऊस कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती.

ABOUT THE AUTHOR

...view details