महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर : 30 खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीलाच गळती - लातूर बातमी

दरवर्षी पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या लातूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. असे असताना केवळ नियोजनाअभावी विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. माळकोंजी ता. औसा येथील पाण्याच्या टाकीला गेल्या काही दिवसांपासून गळती लागली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

Leakage of tank supplying water to 30 villages
पाण्याच्या टाकीलाच गळती

By

Published : Dec 29, 2020, 8:51 PM IST

Updated : Dec 29, 2020, 9:07 PM IST

लातूर - दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागणाऱ्या लातूर जिल्ह्यात यंदा वरुणराजाने कृपादृष्टी दाखवली आहे. त्यामुळे जानेवारी उजाडत असला तरी तलाव, बंधारे हे ओव्हर फ्लो आहेत. मात्र, नियोजनाअभावी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची नामुष्की ओढवत आहे. औसा तालुक्यातील माळकोंजी येथे 30 खेडी पाणीपुरवठा योजनेची अशीच अवस्था झाली आहे.

30 खेड्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीलाच गळती
निसर्गाने यंदा भरभरून दिले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर योग्य नियोजन नसल्याने औसा तालुक्यातील किल्लारी, मंगरूळ, नांदुर्गा, गुबाळ गावच्या ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किल्लारी तसेच परिसरातील गावांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, या दृष्टीने माळकोंजी येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. ३० खेडी योजनेतून या टाकीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून टाकी भरली तरी अवघ्या काही वेळात रिकामी होत आहे. केवळ पाईपलाईनच लिकेज नाही तर पाण्याच्या टाकीलाही गळती लागलेली आहे. हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती असली तरी इतर वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कायम पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे. सर्व यंत्रणा सक्षम असतानाही केवळ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना हा त्रास सहन करावा लागत आहे.
Last Updated : Dec 29, 2020, 9:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details