लातूर- वेळ अमावस्या साजरी करण्यासाठी गावी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 24 डिसें) रोजी घडली. शाम वसंत राजगिरवाड (वय 19 वर्षे, रा. चेरा, ता. जळकोट) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
औरंगाबाद-मुखेड या एसटी बसची व जीपची समोरासमोर धडक झाली होती. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले होते तर 15 हून अधिक प्रवासी जखमी झाले असून यामध्ये शामच्या आजीचाही समावेश आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामधील चंदन सावरगाव जवळ घडली होती.