लातूर - चार महिन्यात लॉकडाऊन आणि अनलॉक अशी प्रक्रिया कायम राहिली आहे. मात्र, अनलॉक सुरू असतानाही नागरिकांनी इतर वस्तू खरेदीवर भर दिलेला नाही. भाजीपाला, किराणा, सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी यावरच नागरिकांनी भर दिला. प्रशासन परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी कायम प्रयत्नशील आहे. स्थानि पातळीवरील वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न 'ईटीव्ही भारत'न केला आहे.
नागरिकांकडून केवळ मुलभूत गरजांनाच प्राधान्य; बाजारपेठेतील अर्थचक्र थांबले - LATUR CORONA GROUND SITUTION
अनलॉक सुरू असतानाही नागरिकांनी इतर वस्तू खरेदीवर भर दिलेला नाही. भाजीपाला, किराणा, सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी यावरच नागरिकांनी भर दिला. त्यामुळे बाजारपेठेतील अर्थचक्र थांबले आहे.
कोरोनाचा परिणाम आता ग्रामीण भागातही जाणवू लागला आहे. एकीकडे रुग्णसंख्या वाढत असतानाही परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचा सरकारचा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळेच कधी लॉकडाऊन तरी कधी अनलॉक अशी अवस्था पाहवयास मिळत आहे. अनलॉक सुरू असतानाही नागरिकांनी केवळ भाजीपाला, किराणा सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी केली आहे. इतर काही वस्तूंमध्ये पैसे खर्च करण्याची मानसिकता नागरिकांमध्ये दिसत नाही. गरज असतानाही काही नागरिक हे पैशांअभावी खरेदी करू शकत नाहीत हे वास्तव आहे.
गेल्या दोन महिन्यात मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळे पार पडले. मात्र, या समारंभात हौस पूर्ण करण्याला नागरिकांनी नाराजी दर्शवली. कोरोनामुळे नागरिकांना आर्थिक नुकसानासह मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. चैनीच्या वस्तू खरेदी न करता केवळ मुलभूत गरजा पूर्ण होतील इतकीच खरेदी केली जात असल्यामुळे बाजारपेठेतील अर्थचक्र थांबले आहे.