लातूर- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने देशाच्या राजधानीत १४ डिसेंबरपासून भारत बचाव आंदोलन केले जाणार आहे. त्याअनुषंगाने देशभरातून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रामलीला मैदानाकडे मार्गस्थ होत आहेत. त्याप्रमाणेच लातुरातूनही हजारो कार्यकर्ते गुरुवारी दिल्लीला रवाना झाले आहेत.
'भारत बचाव' आंदोलनासाठी काँग्रेसचे पदाधिकारी दिल्लीकडे रवाना - congress news
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने दिल्लीत १४ डिसेंबरपासून भारत बचाव आंदोलन केले जाणार आहे. त्याअनुषंगाने देशभरातून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रामलीला मैदानाकडे मार्गस्थ होत आहेत.
हेही वाचा -विवाहित महिलेची राजस्थानात 2 लाखात विक्री; 6 आरोपींना अटक
लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. यामध्येच जिल्ह्यात आमदार अमित देशमुख यांचे नेतृत्व दाखवून देण्याच्या अनुषंगाने बुधवारपासून येथील काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांची गर्दी होत आहे. दिल्ली येथे होणाऱ्या या आंदोलनासाठी जिल्हाभरातून एक हजार कार्यकर्ते रवाना झाले आहेत. आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यकर्ते रवाना होत आहेत. दुसरीकडे आमदार अमित देशमुख यांना मंत्री पदावरूनही जोरदार चर्चा सुरू आहे. नेमके मंत्रिपद जिल्ह्याच्या पदरात पडणार का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. असे असतानाच हे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिल्लीकडे रवाना होत आहेत. यामधून शक्तिप्रदर्शन तर केले जात नाही ना, असा सवालही उपस्थित केला जात आहे.