महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढीव वीजबिलाला त्रासून लातूरकर घुसले महावितरण कार्यालयात - Municipal Corporation

वीज बिलात पारदर्शकता यावी आणि महावितरणचा कारभार सुखकर व्हावा, याकरिता महावितरणाने नव्याने वीजमीटर बसवली. मात्र, या मीटरमुळे ग्राहकांना वाढीव बिल येत आहे. त्यामुळे नव्याने वीजमीटर बसवू नयेत तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. मात्र, त्याची अंमलबाजवणी होत नसल्याने आज ग्राहकांनी थेट मुख्य अभियंता यांचे कार्यालय गाठले आणि आपले गाऱ्हाणे मांडले.

वाढीव वीजबिलाला त्रासून लातूरकर घुसले महावितरण कार्यालयात

By

Published : Aug 2, 2019, 9:32 PM IST

लातूर- मागील २ महिन्यापासून वाढीव वीज बिलामुळे ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. अत्याधुनिक पद्धतीचे मीटर बसविल्यानेच बिलात वाढ झाली असल्याचा आरोप ग्राहकांमधून होत आहे. त्यामुळे नव्याने वीजमीटर बसवू नयेत तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. मात्र, त्याची अंमलबाजवणी होत नसल्याने आज ग्राहकांनी थेट मुख्य अभियंता यांचे कार्यालय गाठले आणि आपले गाऱ्हाणे मांडले.

वाढीव वीजबिलाला त्रासून लातूरकर घुसले महावितरण कार्यालयात

वीज बिलात पारदर्शकता यावी आणि महावितरणचा कारभार सुखकर व्हावा, याकरिता नव्याने मीटर बसविण्याची मोहीम महावितरणाने हाती घेतली आहे. मात्र, या मीटरमुळे ग्राहकांना वाढीव बिल येत आहे. बिलामध्ये दुपटीने वाढ होत असल्याने अनेकांनी बिल अदाच केली नाहीत. त्यामुळे वीजबिल भरणा न केल्यामुळे विद्युत प्रवाह खंडित करण्याची मोहीम महावितरणने हात घेतली. मात्र, हेच अत्याधुनिक मीटर ग्राहकांवर लादू नका, असे जळगावच्या पालकमंत्र्यांनी आदेश दिले आहेत.

त्यानंतर तोच निर्णय लातूर येथील जिल्हा नियोजन बैठकीत झाला होता. मात्र, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या आदेशाचेही पालन न करता महावितरणकडून कारवाई होत असल्याने आज ग्राहकांनी व काँग्रेसच्या नगरसेवकांनी थेट मुख्य अभियंता याचे दालन गाठले. नव्याने बसविण्यात आलेले मीटर काढावेत. तसेच वाढीव बिल भरण्याची सक्ती ग्राहकांवर करू नये, या मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी मनपाचे विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांच्यासह ग्राहकांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details