महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 29, 2020, 8:49 AM IST

ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या तरुणाची दारूच्या नशेत आत्महत्या

लॉकडाऊनपूर्वी संजीव हा पुण्यात इलेक्ट्रिकची कामे करत होता. त्यानंतर लॉकडाऊन काळात काम मिळत नसल्याने गावी आला होता. मात्र, गावातही काम मिळत नसल्याने तो नैराश्याच्या गर्तेत गेला. त्यातच त्याने दारूच्या नशेत आपले जीवन संपवले.

youth suicide
तरुणाची दारूच्या नशेत आत्महत्या

निलंगा(लातूर) - लॉकडाऊमुळे बेरोजगार झालेल्या तरुणाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निलंगा तालुक्यातील हलगरा येथे घडली आहे, संजीव काशिनाथ दुधभाते(२५), असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येची ही घटना २५ ऑगस्टला घडली आहे.

लॉकडाऊनपूर्वी संजीव हा पुण्यात इलेक्ट्रिकची कामे करत होता. त्यानंतर लॉकडाऊन काळात काम मिळत नसल्याने गावी आला होता. मात्र, गावातही काम मिळत नसल्याने तो नैराश्याच्या गर्तेत गेला. त्यातच त्याने दारूच्या नशेत आपले जीवन संपवले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजीवचे वडील काशिनाथ रानबा दुधभाते यांच्या तक्रारीनुसार त्यांचा मुलगा २५ तारखेला रात्री दारू पिऊन आला होता. तो पूर्णपणे नशेत होता. त्यावेळी घरातील महिला ज्येष्ठ गौरी आगमनाची तयारी करत होत्या. रात्री तो उशिरा आला व झोपायला म्हणून खोलीत गेला. त्यानंतर मध्यारात्रीच्या सुमारास त्याने गळफास लावून आत्महत्या केली.

ABOUT THE AUTHOR

...view details