लातूर- नागरिकत्व विधेयकाला विरोध करत लातुरात शुक्रवारी जमीयत उलेमा ए हिंद या संघटनेच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. या विधेयकामुळे देशातील नागरिकांवर अन्याय होणार आहे. त्यामुळे या विधेयकाला विरोध करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
लातुरात जमीयत उलेमा हिंदचा मूकमोर्चा हेही वाचा - लातूरमध्ये 'कॅब'च्या विरोधात 'जमीयत ए उलेमा हिंद' इतर पक्षांचा मोर्चा
नागरिकत्व विधेयक मंजूर झाले असले तरी या विधेयकाला मुस्लीम समाजाच्यावतीने विरोध केला जात आहे. या विधेयकामुळे अफगाणिस्थान, बांगलादेश आणि पाकिस्थानातील हिंदू, शीख, बौद्ध जैन आणि पारशी या समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. मात्र, यामध्ये मुस्लीम समाजाचा समावेश नाही. त्यामुळे या विधेयकाला विरोध करत गंजगोलाई ते गांधी चौक या दरम्यान हजारो मुस्लीम बांधवानी मूकमोर्चात सहभाग नोंदवला.
हेही वाचा - बसखाली चिरडून वृद्ध प्रवाशाचा मृत्यू; लातूरच्या किनगावातली घटना
हा कायदा देशाच्या एकात्मतेसाठी धोकादायक आहे. देशात केवळ हुकूमशाही सुरु आहे. देशातील नागरिकांची चिंता या सरकारला नाही. परंतु, परदेशाच्या नागरिकांची एवढी चिंता का? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. सत्तेचा गैरवापर केला जात आहे. या धोरणामुळे जातीयवाद वाढणार आहे. त्यामुळे 'सबका साथ, सबका विकास' म्हणून सत्तेवर आलेल्या सरकारची हीच का भूमिका? असा सवालही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.