महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दुटप्पी भूमिकेमुळेच 'वंचित बहुजन आघाडी' महाआघाडीपासून दूर राहिली, हर्षवर्धन पाटलांचा आरोप - lok sabha2019

वंचित बहुजन आघाडी स्थापनेचा उद्देश केवळ आघाडीतील मित्र पक्षांच्या मतावर परिणाम एवढाच आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्शवर्धन पाटील

By

Published : Apr 11, 2019, 8:49 PM IST

लातूर - महाआघाडीत वंचित बहुजन आघाडीचा समावेश व्हावा यासाठी सर्वच पक्ष दोन हात पुढे करीत होते. मात्र, एकीकडे आघाडीबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकर लोकसभेचे उमेदवार जाहीर करीत होते, अशा दुटप्पी भूमिकेमुळेच वंचित बहुजन आघाडी महाआघाडीपासून दूर राहिल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांनी केला. लातुरात काँग्रेसचे उमेदवार मच्छिद्र कामंत यांच्या प्रचारानिमित्त आले असता पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

पाटील म्हणाले, वंचित बहुजन आघाडी स्थापनेचा उद्देश केवळ आघाडीतील मित्र पक्षांच्या मतावर परिणाम एवढाच आहे. महाआघाडीच्या उद्देशाने प्रकाश आंबेडकर यांच्यासमवेत ७ बैठका झाल्या. दरम्यान त्यांना १० जागा देण्याचे दोन्ही मित्र पक्षाने ठरिवले. एवढेच नाही, तर वरिष्ठांशी चर्चा करून त्यांना आणखी २ जागांवर संधी देण्याचा मानस होता. परंतु अखेरीस वंचित बहुजन आघाडीने थेट २२ जागा मागितल्या आणि यामुळेच ते महाआघाडीत समाविष्ट झाले नाहीत. त्यांचा वेगळाच हेतू असून तो आता जनतेच्या लक्ष्यात आला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्शवर्धन पाटील

राफेल, महागाई, बेरोजगारी यासारखे प्रश्न समोर असताना भाजप राष्ट्रहिताचे मुद्दे हाताळत आहे. शिवाय काँग्रेसचा जाहिरनामा हा पाकिस्तान हिताचा आहे, असा आरोप भाजप करीत आहे. तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे मोदीच पंतप्रधान व्हावेत, असा आशावाद व्यक्त करतात. त्यामुळे खरे काय आणि खोटे काय हे जनताच ठरवेल. गतवेळच्या जाहिरनाम्यातील एकही आश्वासन भाजप सरकारने अवलंबले नाही. त्यामुळे यंदाच्या संकल्पातील सर्व घोषणा या फसव्या आहेत. जनतेचा विश्वास उडाला असून यंदाच्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असा आशावादही पाटील यांनी व्यक्त केला.

राफेलसह वाढती महागाई, बेरोजगारी आणि सर्व समाजातील आरक्षणाचा प्रश्न या सरकारने राखडून ठेवला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर, शहराध्यक्ष मोईन खान यांची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details