लातूर - राज्यातील 7 शहरात पाईपलाईनद्वारे गॅसचा पुरवठा केला जातो. त्यात आता लातूरचाही समावेश करण्यात आला असून लवकरच लातूरकरांनाही गॅस पुरवठा पाईपलाईनद्वारे केला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.
लातूर शहरात अशोका गॅस एजन्सीच्या माध्यमातून पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस पुरवठा प्रकल्पाचे भूमिपूजन नुकतेच झाले. राज्यातील केवळ 7 शहरात पाईपलाईनद्वारे गॅसपुरवठा होत आहे. त्यात आता लातुरचाही समावेश झाल्याने पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस देणारे मराठवाड्यातील पहिले शहर ठरले आहे. लातूर शहरातील पाईपलाईनद्वारे घरगुती गॅस देण्याचे काम पूर्ण होताच शहरालगतच्या गावातही पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा केला जाणार आहे.