निलंगा (लातूर) - महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री तथा निलंग्याचे सुपुत्र डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज (बुधुवार) वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. निलंगा येथील त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र विजय निलंगेकर पाटील यांनी मुखाग्नी दिला. कोरोनाच्या संकटामुळे नागरिक कमी प्रमाणात होते. शिवाय फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन केले जात होते. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
निलंगा शोकाकूल: शिवाजी पाटील निलंगेकर अनंतात विलीन.. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - लातूर न्यूज
महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री तथा निलंग्याचे सुपुत्र डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आज (बुधुवार) वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. निलंगा येथील त्यांच्या शेतामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र विजय निलंगेकर पाटील यांनी मुखाग्नी दिला.
लातूर जिल्ह्याने आतापर्यंत २ मुख्यमंत्री राज्याला दिले एक दिवंगत विलासराव देशमुख आणि दुसरे दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर. दुर्दैवाने आज दोघेही जग सोडून गेले. एम.ए. एल.एल.बी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले शिवाजीराव निलंगेकर सर्वाधिक काळ निलंग्याचे आमदार राहिले होते. यानंतर मंत्रिमंडळातील विविध मंत्रीपदे संभाळल्यानंतर 1985 साली त्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली होती. 9 महिण्यांसाठी हे पद त्यांच्याकडे होते. मात्र, या काळात ग्रामीण भागापर्यंत शिक्षण कसे पोहचवले जाईल, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. उतारवयात आणि राजकारणाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना किडनीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे सातत्याने उपचारासाठी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत होते. मात्र, ऐन नव्वदीत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी 90 व्या वर्षीदेखील कोरोनावर मात केली. मात्र, हा योद्ध्याला किडनीच्या त्रासापुढे हार मानवी लागली.
कोरोनावर मात करून दोन दिवस उलटले असतानाच त्यांचा पुणे येथे मृत्यू झाला. दुपारी 2 च्या दरम्यान त्यांचे पार्थिव निलंगा येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. २ तास दर्शनासाठी हे पार्थिव ठेवण्यात होते. दरम्यान, शहरातील सर्व बाजारपेठ बंद होती. तर शहरात कमालीचा शुकशुकाट होता. कोरोनाच्या संकटामुळे अनेक मान्यवरांची उपस्थिती अंत्यविधीला नव्हती. यावेळी आ. संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत उपस्थित होते. शहराला लागूनच असलेल्या शेतामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.