महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कृषी महाविद्यालय विद्यार्थी आंदोलनाचा चौथा दिवस; प्रचार्य म्हणतात 'हे मला समजण्या पलीकडचे'

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र तरी विद्यार्थ्यांनी माघार घेतलेली नाही. या सर्व प्रकारबद्दल प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, "सर्व काही सुरळीत होते. कृषी महाविद्यालयात २४ आणि २५ जानेवारीला कुलगुरुंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडले. त्यादरम्यान एकाही मुलाने तक्रार केली नाही. त्यानंतर एक दिवस जाताच असे काय घडले, की थेट मुलांनी आंदोलनाची भूमिका घेतली, हे माझ्याही समजण्यापलीकडे आहे"

प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे
प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे

By

Published : Jan 30, 2020, 8:24 PM IST

लातूर -कृषी महाविद्यालयात गेल्या चार दिवसांपासून प्राचार्यांना हटवण्यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. याप्रकरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी अखेर मौन सोडले आहे. विद्यार्थ्यांनी ही भूमिका का घेतली, यामागचे मुख्य कारण त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले नसले तरी, विद्यार्थ्यांचे वेगळे मत असू शकते हे मान्य करत त्यांनी विद्यार्थ्यांची स्तुती केली आहे.

प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांच्याशी बातचीत

कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी विद्यार्थ्यांची समजूत काढून त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र तरी विद्यार्थ्यांनी माघार घेतलेली नाही. या सर्व प्रकारबद्दल प्राचार्य बाबासाहेब ठोंबरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, "सर्व काही सुरळीत होते. कृषी महाविद्यालयात २४ आणि २५ जानेवारीला कुलगुरुंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडले. त्यादरम्यान एकाही मुलाने तक्रार केली नाही. त्यानंतर एक दिवस जाताच असे काय घडले, की थेट मुलांनी आंदोलनाची भूमिका घेतली, हे माझ्याही समजण्यापलीकडे आहे"

हेही वाचा -कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन रात्रीही सुरुच

महाविद्यालयातील सर्व मुले गुणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वर्षभर कुणाला काही समस्या उद्भवली नाही. आता वर्ष अंतिम टप्प्यात असतानाच काही विशिष्ट घटकाला काय समस्या निर्माण झाली हे आता तरी सांगता येणार नसल्याचे ते म्हणाले. प्रात्यक्षिकांदरम्यान विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त काम करून घेतले जाते. महाविद्यालय आणि वसतिगृहात मूलभूत सुविधा नाहीत, असे अनेक आरोप विद्यार्थ्यांनी केले आहेत. कुलगुरूंनी विद्यार्थ्यांची बैठक घेतली असून काही दिवसांमध्येच ते निर्णय देतील. विद्यार्थ्यांनी कारवाईबद्दल लेखी दिले तरच माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details