महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक.. भांडण सोडविण्यास गेलेल्या माजी सरपंचाची गुन्ह्यात नाव आल्याने आत्महत्या, लातूरमधील घटना

भालचंद्र माने १५ वर्ष गावचे सरपंच होते. त्यामुळे गावात भांडण होऊ नयेत अशी त्यांची कायम भूमिका राहिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी बोरवटी गावात दोन गटात हाणामारी झाली होती. या दरम्यान भालचंद्र यांनी वडिलधाऱ्यांची भूमिका घेत गाव स्तरावरच भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर दोन्ही गटांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. या प्रकरणात आरोपी म्हणून माजी सरपंच भालचंद्र माने यांचेही नाव आले.

धक्कादायक.. भांडण सोडविताना गुन्ह्यात नाव आल्याने माजी सरपंचाची आत्महत्या, लातूरमधील घटना

By

Published : May 31, 2019, 7:44 PM IST

लातूर - १५ वर्ष गावचे सरपंचपद भूषवून अखेर गुन्ह्यामध्ये नाव आल्याने तालुक्यातील बोरवटी गावच्या माजी सरपंचाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी घडली. गावतल्या दोन गटातील भांडण सोडवण्यासाठी या माजी सरपंचाने मध्यस्थी केली होती. यातूनच त्यांचे नाव या प्रकरणाशी जोडण्यात आले होते.

भालचंद्र माने १५ वर्ष गावचे सरपंच होते. त्यामुळे गावात भांडण होऊ नयेत अशी त्यांची कायम भूमिका राहिली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी बोरवटी गावात दोन गटात हाणामारी झाली होती. या दरम्यान भालचंद्र यांनी वडिलधाऱ्यांची भूमिका घेत गाव स्तरावरच भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर दोन्ही गटांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले. या प्रकरणात आरोपी म्हणून माजी सरपंच भालचंद्र माने यांचेही नाव आले. राजकीय कारकिर्दीमध्ये पोलीस ठाण्याची पायरी न चढलेल्या मानेंचे थेट आरोपी म्हणून नाव आल्याने त्यांना मानसिक धक्का सहन झाला नाही. यातूनच त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनास्थळी चिट्टी मिळाली असून यामध्ये दोन्ही गटातील भांडण सोडिवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, माझे नाव गुन्ह्यात दाखल करण्यात आले. हा मनस्ताप सहन न झाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भालचंद्र माने हे मनमिळावू स्वभावाचे होते. मात्र, त्यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details