महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करावे, पालकमंत्री अमित देशमुखांचे आवाहन

जिल्हा क्रिडा संकुलनातील १५० फूट उंच असलेल्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नूतन पालकमंत्री अमित देशमुख यांनी शासनाच्या योजनांचा नागरिकांना कसा फायदा होणार आहे हे पटवून सांगितले.

flag hoisting-by-guardian-minister-amit-deshmukh-in-latur
flag hoisting-by-guardian-minister-amit-deshmukh-in-latur

By

Published : Jan 27, 2020, 8:35 AM IST

Updated : Jan 27, 2020, 10:08 AM IST

लातूर- प्रजाकसत्ताक दिनानिमित्त काल (रविवारी) शहरात शासकीय कार्यालये, शाळांमध्ये तसेच ठिकठिकाणी ध्वजारोहण झाले. येथील जिल्हा क्रिडा संकुलनात पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. परिपाठाच्या वेळी जिल्हा परिषद तसेच माध्यमिक शाळांमध्ये संविधान उद्देशिकेचे वाचन करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते लातुरात ध्वजारोहण

हेही वाचा-मुंबईत जन्मलेला मुख्यमंत्री तुम्हाला मिळाला, मला मुंबईच्या प्रश्नांची जाण - मुख्यमंत्री

जिल्हा क्रिडा संकुलनातील १५० फूट उंच असलेल्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. नूतन पालकमंत्री अमित देशमुख यांनी शासनाच्या योजनांचा नागरिकांना कसा फायदा होणार आहे हे पटवून सांगितले. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदानाचा टक्का वाढणेही गरजेचे आहे. महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत दोन लाखापर्यंतचे पीककर्ज माफ होणार आहे. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून शासनाने ठवरून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

स्वातंत्र्य सैनिक यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास आमदार धीरज देशमुख, माजी आमदार वैजिनाथ शिंदे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मनपा आयुक्त एम. डी. सिंह, महापौर विक्रांत गोजमगुंडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटनकर यांची उपस्थिती होती. दरम्यान, पोलीस दलाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या संचलनाला पालकमंत्र्यांनाी सलामी दिली.

Last Updated : Jan 27, 2020, 10:08 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details