महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन् सभेच्या काही क्षणापूर्वी लावले आदित्य ठाकरेंचे फलक - Rally

सोमवारी शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होत आहे. सभेच्या फलकावर आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत.

...अन् सभेच्या काही क्षणापूर्वी लावले आदित्य ठाकरेंचे फलक

By

Published : Apr 15, 2019, 4:57 PM IST

लातूर- सोमवारी शहरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा होत आहे. सभेच्या फलकावर आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने युवासेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फलकांवर आदित्य ठाकरेंचा फोटो न लावल्यामुळे सभा उधळून लावण्याचेही संकेत दिले. त्यामुळे सभा सुरू होण्याच्या काही क्षणापूर्वी सभेच्या ठिकाणी युवासेनेचे फलक लावण्यात आले आहेत.

...अन् सभेच्या काही क्षणापूर्वी लावले आदित्य ठाकरेंचे फलक

लोकसभेच्या सेना आणि भाजप यांच्यामध्ये युती झाली असली तरी स्थानिक पातळीवर काही कार्यकर्त्यांमधील मतभेद हे कायम आहेत. त्याचाच प्रत्यय लातूरमधील या सभेत दिसुन आला आहे. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा फोटो नसल्याने ग्रामीण भागात युवासेनेकडून सभा होऊ दिल्या नव्हत्या. भाजपकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप यापूर्वीच युवासेनेने केलेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details