महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकरी प्रश्नांसाठी छावा संघटनेचे आमरण उपोषण; विविध संघटनांचा आंदोलनाला पाठिंबा - मनसे

नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून राज्यसरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ऐन पावसाळ्यात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेने हे उपोषण केले आहे.

शेतकरी प्रश्नांसाठी छावा संघटनेचे आमरण उपोषण

By

Published : Aug 19, 2019, 6:36 PM IST

लातूर - छावा संघटनेचे औसा तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत आहे. नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून राज्य सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे. ऐन पावसाळ्यात पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने शेतकऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेने हे उपोषण केले आहे. छावा संघटनेच्या या उपोषणाला अनेक संघटनांनी पाठींबा दिला आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिले आहे.

विविध संघटनांचा उपोषणाला पाठिंबा

लातूरसह मराठवाड्यात हंगामाच्या सुरवातीपासून पावसाने पाठ फिरवलेली आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा हाहाकार होत असला तरी मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर भर पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या कायम आहे. ही सर्व स्थिती समोर असतानाही शेतकऱयांसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी होत नाही. शासकीय अनुदान, पिकविमा, कर्जमाफी यासारखे विषय रखडले आहेत. परिणामी शेतकरी आत्महत्या करीत आहे. पावसाळ्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे दावणीला चारा द्यावा, खरीपाचे सरसकट नुकसान म्हणून हेक्टरी ५० हजार रुपये, ठीबक सिंचनासाठी १०० टक्के अनुदान, पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था करावी. तसेच विजबिल माफ करावे .या मागणीसाठी छावा संघटनेचे विजय घाडगे यांनी सहकाऱ्यांसमवेत सुरू केले आहे. सोमवारी उपोषणाचा चौथा दिवस असतानाही जिल्हा प्रशसनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही. सोमवारी प्रहार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, मनसेच्या वतीने छावा संघटनेच्या उपोषणाला पाठींबा दर्शिवला आहे. यावेळी निवासी जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांना निवेदन देण्यात आले आहे.

दरम्यान, मागण्यांवर लवकर मान्य कराव्यात. अन्यथा आक्रमक पवित्रा घेऊन उपोषण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details