लातूर - मंदिराच्या जागेवर शेतकऱ्यांचे अतिक्रमण होत असल्याने मंदिराच्या विकासाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. लातूर तालुक्यातील नांदगाव येथील महादेव मंदिराच्या इनामी ११ एकर शेतजमिनीवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करत सहा रस्ते तयार केले आहेत. यामुळे देवस्थानच्या ट्रस्टसह ग्रामस्थही हैराण झाले असून, संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा ट्रस्टच्यावतीने देण्यात आला आहे.
मंदिराच्या जागेत शेतकऱ्यांचे अतिक्रमण ; ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा - farmer
मंदिरपरिसरात अतिक्रमण वाढत असल्याने ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनापासून आयुक्तापर्यंत दोन वर्षापासून पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूरच्या तहसीलदारांना अनेकदा याबाबतीत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
मंदिरपरिसरात अतिक्रमण वाढत असल्याने ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनापासून आयुक्तापर्यंत दोन वर्षापासून पाठपुरावा केला. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूरच्या तहसीलदारांना अनेकदा याबाबतीत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. पण, अद्यापही देवस्थानच्या शेतजमीनीवर अतिक्रमण करुन केलेले रस्ते बंद झाले नाहीत. या गावाला असलेला शासकीय रस्ताही गायब झाला आहे. तो रस्ता मोकळा करुन द्यावा व महादेव मंदिराच्या शेतजमीनीत तयार केलेले रस्त्यांचे अतिक्रमण काढून द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.