लातूर- पावसाने नुकसान झालेल्या पीक पाहणीचे दौरे सुरू आहेत. सत्ताधारी-विरोधक हे पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद करत आहेत. पण हे दौरे फोटोपुरते मर्यादित राहत असले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
नुकसान पाहणीचे नाटक होत असेल तर मदतीसाठी आंदोलन उभारणार-राजू शेट्टी
पावसाने नुकसान झालेल्या पीक पाहणीचे दौरे सुरू आहेत. सत्ताधारी-विरोधक हे पीक नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. मात्र हे दौरे फोटोपुरते मर्यादित राहत असले तर स्वाभिमानी शेतकरी संघटना मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला आहे.
लातूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर ही पिके तर पाण्याबरोबर वाहून गेली आहेत पण शेत जमीनही खरडून गेली आहे. त्या अनुषंगाने गेल्या तीन दिवसांपासून सर्व खात्याचे मंत्री हे पीक नुकसान पाहणीसाठी येत आहेत. पण हे दौरे केवळ रस्त्या लगतच्या भागाचे होत आहेत. केवळ पाहणी केली आणि फोटो काढून दिखाऊपणा केला जात आहे. असे असनुही शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन उभारणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. खरिपात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आता भरीव मदत झाली तर रब्बी हंगाम शेतकऱ्यांना करता येणार आहे. त्यामुळे दोन्ही सरकारने मतभेद बाजूला करून प्रत्यक्ष मदतीकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. राजू शेट्टी यांनी औसा तालुक्याच्या शिवारातील पीक नुकसानीची पाहणी करून मंगळवारी सकाळी लातूर येथे पत्रकार परिषद घेतली.
हेही वाचा -हात झटकण्यात तिनही पक्ष तरबेज! आता तरी मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवावी - फडणवीस
राज्यात अतिवृष्टीमुळे 30 हजार कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. शासकीय आकडेवारी काहीही असली तरी प्रत्यक्ष अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे पाहणी करण्यापेक्षा प्रत्यक्ष मदत करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.