लातूर-जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अधिक आहे. गुरुवारी लातूर जिल्ह्यात 8 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नामुन्यांपैकी 5 जणांचे तर उदगीर येथील 3 जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 36 वर गेली आहे.
शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होऊ लागला आहे. बुधवारी 6 नव्या रुग्णांची भर पडल्यानंतर गुरुवारी 8 रुग्ण वाढले आहेत. 8 पैकी 2 रुग्ण लातूर शहर, 1 बाभळगाव, 4 उदगीर तर उस्मानाबाद जिल्ह्यातून रेफरहुन आलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे. लातूर मधून 64 तर उदगीर सामान्य रुग्णालयातून 48 व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी दाखल झाले होते.