लातूर - हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार लातूर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे फळबागांसह भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाल्याने आंब्याचा बागांवरही परिणाम झाला आहे. अहमदपूर, उदगीर, निलंगा तालुक्यासह शिरुरताजबंद, चापोली या ठिकाणी गुरूवारी (४ एप्रिल) दुपारी गारांचा पाऊस झाला.
लातुरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस; फळबागासह भाजीपाल्याचे नुकसान - meterology department
अत्यल्प पाणीसाठ्यावर घेतलेले भाजीपाल्याचे उत्पादन अखेरच्या टप्प्यात होते. त्यामुळे दुष्काळात तेरावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
सध्या रब्बी पिकांची काढणी झाली आहे. मात्र, या फळबागांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अत्यल्प पाणीसाठ्यावर घेतलेले भाजीपाल्याचे उत्पादन अखेरच्या टप्प्यात होते. त्यामुळे दुष्काळात तेरावा, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून उन्हाची दाहकता वाढली होती. पारा ३९ अंशावर गेला होता. गुरुवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.
मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. दुपारपर्यंत ढगाळ वातावरण आणि त्यानंतर जिल्ह्यातील काही मंडळाला अवकाळी पावसाने झोडपले आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाली असली तरी जनावरांच्या चाऱ्याचे आणि फळबागांचे यामध्ये नुकसान झाले आहे. टरबूज आणि खरबूजावर करप्या रोगाचा आणि आंब्याचा मोहर गळतीचा धोका निर्माण झाला आहे.
दुपारी ३ च्या दरम्यान वादळी वाऱ्यासह शिरुर अनंतपाळ, निलंगा, उदगीर, अहमदपूर या तालुक्यांमाध्ये गारांसह पावसाला सुरवात झाली होती.