महाराष्ट्र

maharashtra

...म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गाण्यावर धरला ठेका

By

Published : Feb 8, 2020, 12:19 AM IST

लातूर- नांदेड या जिल्ह्यात अटीतटीचा क्रिकेट सामना झाला. एक षटक राखून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर संघाबरोबर गाण्यावर ठेका धरत जिल्हाधिकारी यांनी आनंद साजरा केला.

district-collector-dance
जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गाण्यावर धरला ठेका

लातूर : लातुरात शुक्रवारपासून विभागीय क्रीडा स्पर्धांना सुरवात झाली आहे. पहिल्याच दिवशी लातूर- नांदेड या जिल्ह्यात अटीतटीचा क्रिकेट सामना झाला. एक षटक राखून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर संघाबरोबर गाण्यावर ठेका धरत जिल्हाधिकारी यांनी आनंद साजरा केला.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गाण्यावर धरला ठेका

७ फेब्रुवारी पासून लातुरात विभागीय क्रीडा स्पर्धांना सुरवात झाली आहे. याची तयारी म्हणून गेल्या काही महिन्यांपासून महसूल विभागाचा संघ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मैदानावर कसून सराव करीत होता. त्यामुळेच आजच्या पहिल्या सामन्यात त्यांना विजय खेचता आला आहे. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या नेतृत्वात हा विजय मिळाला आहे.

दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित लातूर विरुद्ध नांदेड क्रिकेट सामन्यात नांदेड संघाने प्रथम फलंदाजी करताना बारा षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात ८६ धावा फटकावल्या. तर नांदेड संघाकडून फलंदाज रोडे व श्रीकांत यांनी प्रत्येकी १८ व १६ धावांचे योगदान दिले. तर इतर फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

लातूर क्रिकेट संघाचं गोलंदाज विलास मलीशे, स्वामी, सुनील शेळके व कर्णधार श्रीकांत यांनी प्रत्येकी नांदेड संघाचा एक गडी बाद केला. १२ षटकांमध्ये माफक टार्गेट देण्यात आले असले तरी अंतिम टप्प्यात हा सामना रंगत झाला. त्यामुळे विजय मिळताच संघातील सर्व खेळाडूंनी गाण्यावर ठेका धरला यामध्ये जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनीही मनसोक्त आनंद लुटला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details