महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूरच्या आयकॉन रुग्णालयाचा बेजबाबदारपणा; टाकाऊ साहित्य टाकले उघड्यावरच - icon covid care center latur

बार्शी रोडवर असलेल्या आयकॉन कोविड केअर रुग्णालयाने रुग्णांनी वापरलेले टाकाऊ साहित्य रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत उघड्यावर टाकले.

आयकॉन रुग्णालय
आयकॉन रुग्णालय

By

Published : May 3, 2021, 9:02 AM IST

लातूर : शहरातील बार्शी रोडवर असलेल्या आयकॉन कोविड केअर रुग्णालयाने रुग्णांनी वापरलेले टाकाऊ साहित्य रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत उघड्यावर टाकले. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून रुग्णालय प्रशासन किंवा महानगरपालिकेने हे उघड्यावर टाकलेले टाकाऊ साहित्य तात्काळ उचलावे अशी मागणी येथील नागरिक करत आहेत.

डॉ.प्रमोद घुगे संचालक असलेल्या आयकॉन कोविड रुग्णालयात 50 बेड असून सध्या येथील आयसीयूमध्येही कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मागील काही दिवसांपुर्वी याच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ऑक्सिजनचा पुरवठा जिल्हा प्रशासनाकडून होत नसल्याकारणाने रुग्णाच्या नातेवाईकांच्या मदतीने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले होते.

शिवाय काही दिवसापुर्वीच रुग्णालयातील टाकाऊ साहित्य उघड्यावर टाकल्याने मनपा प्रशासनाने आयकॉन रुग्णालयावर दंडात्मक कारवाई केली होती. कारवाई नंतरही आयकॉन रुग्णालयाचा हा बेजबाबदारपणा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असून येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details