महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लातूर-बार्शी रोडवर अपघात रोखण्यासाठी अवतरले देव!

लातूर- बार्शी रोडवरील 12 नंबर पाटी जवळील रेल्वे स्टेशन आणि त्याला लागूनच असलेले हरंगूळ गाव यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ऐन गावाजवळील या चौकामध्ये अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत.

लातूर- बार्शी रोडवर अपघात रोखण्यासाठी अवतरले देव...!

By

Published : Jun 21, 2019, 11:03 AM IST

लातूर - लातूर-बार्शी रोडवरील हरंगूळ रेल्वे स्टेशनजळील मार्गावर अपघात रोखण्यासाठी चक्क देव अवतरले आहेत. हे अवास्तव वाटत असले तरी सत्य आहे. अरुंद रस्ता यातच दुभाजकावर दिशादर्शक फलक नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे हरंगूळ येथील नागरिकांनी नामी शक्कल लढवली आहे. दुभाजकावर मोठे दगड ठेवले असून त्याला शेंदूरही लावण्यात आला आहे. एवढेच नाही तर हार घालून त्या दगडांची पूजा करण्यात आली आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी देव अवतरले असले तरी अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अवतरलेले नाहीत.

लातूर- बार्शी रोडवर अपघात रोखण्यासाठी अवतरले देव...!

लातूर-बार्शी रोडवरील 12 नंबर पाटी जवळील रेल्वे स्थानक आणि त्याला लागूनच असलेले हरंगूळ गाव यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. ऐन गावाजवळील या चौकामध्ये अनेक अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न रखडलेला आहे. यातच शहराला सुरुवात होणाऱ्या आणि हरंगूळ येथील रहदारीच्या ठिकाणचे अपघात रोखण्यासाठी दुभाजक आणि पथदिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, पथदिव्याचा झगमगाट हा काही दिवसांपुरताच राहिला. दुभाजकाजवळ दिशादर्शक फलक नसल्याने बार्शीकडून येणारी वाहने थेट दुभाजकावर चढल्याने अनेक अपघात झाले आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याना गावचे व्यंकट पन्हाळे यांच्यासह ग्रामस्थांनी दिशादर्शक फलक उभारण्याची मागणी निवेदन देऊन केली आहे. याकडेही दुर्लक्ष होत असल्याने निषेध म्हणून ग्रामस्थांनी येथे देव अवतारण्याचे ठरिवले होते. यामुळे 8 दिवसापूर्वी रस्त्याच्या मध्यभागी देवाची स्थापना केली आहे. शिवाय देव येथे अवतरले असून त्याची विटंबना होऊ नये तसेच चबुतरा बांधून बसवण्याची खबरदारी घेण्यासही सार्वजनिक बांधकाम विभागाला काळीवले आहे. मार्गस्थ होणाऱ्या प्रवाश्याचे लक्ष वेधून घेतले जाईल आणि अपघात टळेल हा ग्रामस्थांना उद्देश असला तरी या ठिकाणी दिशादर्शक फलक बसवणे काळाची गरज आहे.

या मार्गावर अवतरलेल्या देवाची चर्चा आता सोशल मीडियावर होऊ लागली असून 'देवाक काळजी रे' असे एसएमएस ही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आता हाच एसएमएस सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहावा आणि लवकरच उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details