महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उपमहापौरांनीच ठोकले नगररचना विभागाला टाळे - उपमहापौर देविदास काळे

मागील अनेक दिवसांपासून अधिकारी - कर्मचारी वेळेत येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबत होती. वेळोवेळी समज देऊनही अधिकारी गैरहजर राहत होते. यामुळे उपमहापौरांनी सर्व कार्यालयांची पाहणी केली व यात अधिकारी गैरहजर आढळून आले.

उपमहापौर नगररचना विभागाला टाळे ठोकतांना

By

Published : Jun 10, 2019, 11:40 PM IST

लातूर - महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असून आज प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून उपमहापौर देविदास काळे यांनीच नगररचना विभागाला टाळे ठोकले.

नगररचना विभागाला टाळे ठोकल्याप्रकरणीची माहिती देतांना उपमहापौर


महानगरपालिकेत अधिकारी - कर्मचारी वेळेत येत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची कामे खोळंबत आहेत. विविध प्रकारचे कर भरणा करण्यासाठी नागरिक या विभागात गर्दी करतात. मात्र, अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याने आज दुपारी 4 वाजता टाळे ठोकण्यात आले.


लातूर महानगरपालिकेवर पहिल्यांदाच भाजपाची सत्ता आली आहे. मागील अनेक दिवसांपासून या महापालिकेचा कारभार सुरळीत होण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी प्रयत्न करत आहेत. मात्र, यावर वरिष्ठांचा अंकुश राहिला नसून जनतेला वेठीस धरले जात आहे. त्यामुळे भाजपचे उप महापौर देविदास काळे यांच्या कार्यालयात रोज अधिकाऱ्याबाबतच्या तक्रारी वाढत होत्या. त्या अनुषंगाने वेळोवेळी समज देऊनही अधिकारी गैरहजर राहत होते. यामुळे संतप्त झालेल्या उपमहापौर देविदास काळे यांनी सर्व कार्यालयांची पाहणी केली असता नगररचना कार्यालयात अधिकारी हजरच नव्हते. त्यामुळे त्यांनी तत्काळ कार्यालयास कुलूप लावले. यावेळी कार्यालयातील काही कर्मचारीही आत कोंडल्या गेले.


सत्ताधारी लोकप्रतिनिधेचे प्रशासनातील अधिकारी ऐकतच नाहीत. मात्र त्यांनी जनतेची कामे तरी वेळेत करावी एवढीच अपेक्षा असल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली.

ABOUT THE AUTHOR

...view details