महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्थानिक गुन्हे शाखेकडून 7 गुन्ह्यांची उकल; 5 लाख 77 हजारांचा मुद्देमाल हस्तगत - लातूर गुन्हे बातमी

स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोन ठिकाणी कारवाई करत तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जिल्ह्यातील विविध भागात घडलेल्या सात गुन्ह्यांची उकल करण्यास पथकाला यश आले असून तब्बल 5 लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

म

By

Published : Aug 29, 2021, 9:08 PM IST

लातूर - स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोन ठिकाणी कारवाई करत तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जिल्ह्यातील विविध भागात घडलेल्या सात गुन्ह्यांची उकल करण्यास पथकाला यश आले असून तब्बल 5 लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या सुमित दगडू गरगेवाड व राम दगडू गरगेवाड (रा. मळवटी रोड लातूर) यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याजवळून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल, सोन्याचे दागिने, मोटरसायकल, असा एकूण 4 लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

तसेच अन्य एका गुन्ह्यात लातूर शहरातील राजीव गांधी चौकात सापळा रचून प्राप्त माहितीवरुन मोटार सायकलचोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी साहेबराव अंकुश जाधव (वय 24, रा. रमजानपूर, ता. लातूर, ह. मु. लक्ष्मी कॉलनी, जुना औसा रोड, लातूर) यास गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने
विविध ठिकाणाहून एकूण 4 मोटर सायकली चोरल्याचे कबूल केल्यानंतर त्याच्याकडून सुमारे 1 लाख 20 हजार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही कारवाईमध्ये गुन्हे शाखेकडून तिघांना अटक करण्यात आली असून एकूण 5 लाख 77 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा -विशेष : हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही महिलांचा छळ; लातूरमधील परिस्थिती काय?

ABOUT THE AUTHOR

...view details