लातूर - शहरातील क्रांती नगरात एकाच दोरखंडाने प्रेमयुगलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलाच्या राहत्या घरीच आज संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. फिरोज सय्यद (२२) आणि तरन्नुम शेख (१९) असे या प्रेमीयुगलांचे नाव आहे.
लातुरात प्रेमीयुगलाची एकाच दोरीने आत्महत्या - Couple suicide
लातूर शहरातील क्रांती नगरात प्रेमयुगलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
संबंधित प्रेमी युगलाची घरे समोरसमोरच आहेत. शुक्रवारी लग्नानिमित्ताने फिरोजच्या घरचे बाहेरगावी गेले होते. रात्री घरचे सदस्य परतल्यानंतर ही घटना समोर आली आहे. फिरोजचे शिक्षण हे १० वीपर्यंतच झाले असून तरन्नुम बीए प्रथम वर्षात शिकत होती. गेल्या काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यामधूनच हे कृत्य झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
घटनास्थळी एमआयडीसी पोलीसठाण्याचे कर्मचारी दाखल झाले असून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.