महाराष्ट्र

maharashtra

कोरोना फटका: लातुरात पोल्ट्री व्यावसायिकावर कोंबड्या पुरण्याची वेळ...

By

Published : Mar 20, 2020, 4:40 PM IST

मोहसीन यांनी जमीन विकून, कर्ज काढून 12 लाखांचा खर्च करून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले. निलंगा येथील उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्याकडे याबाबत मोहसीन यांनी निवेदन दिले. मात्र, शासकीय स्तरावर काहीच उपाययोजना नसल्याचे त्यांनी सांगण्यात आले.

corona-effect-on-chicken-business-in-latur
लातुरात पोल्ट्री व्यावसायिकावर कोंबड्या पुरण्याची वेळ...

लातूर- राज्यात कोरोनाचा विळखा मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्यासोबतच अनेक अफवाही पसरत आहेत. चिकन खाल्ल्याने कोरोना होतो. अशा प्रकारची अफवा सोशल मीडियावर फिसरत आहे. त्यामुळे पोल्ट्री व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे. वाढते नुकसान त्यात कोंबड्यांचा सांभाळ करणे परवडणारे नसल्याने निलंगा तालुक्यातील आनंदवाडी गावातील मोहसीन खलील पटेल यांनी त्यांच्याकडील कोंबड्या पुरल्या आहेत.

लातुरात पोल्ट्री व्यावसायिकावर कोंबड्या पुरण्याची वेळ...

हेही वाचा-COVID-19 LIVE : राज्यातील चार मोठी शहरे बंद; पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द!

मोहसीन यांनी जमीन विकून, कर्ज काढून 12 लाखांचा खर्च करून पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले. निलंगा येथील उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्याकडे याबाबत मोहसीन यांनी निवेदन दिले. मात्र, शासकीय स्तरावर काहीच उपाययोजना नसल्याचे त्यांनी सांगण्यात आले.

कर्जबाजारी मोहसीन यांनी व्यवसायात कोरोनामुळे झालेले नुकसान आणि आता वाढता खर्च यामुळे खड्डा करून कोंबड्या पुरल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details