महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जळकोटमध्ये भाजप तालुकाध्यक्ष पदावरून दोन गटात राडा - two bjp groups clashesh in jalkot

नवीन तालुका अध्यक्ष म्हणून अरविंद नागरगोजे यांचीच निवड करण्यात आली. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून पक्षाच्या कार्यात सदैव आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास दिला.

bjp jalkot
भाजप जळकोट

By

Published : Dec 23, 2019, 12:24 PM IST

Updated : Dec 23, 2019, 12:37 PM IST

लातूर- जळकोटमध्ये भाजपचे नवीन तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली. मात्र, या निवडीवरून भाजपच्या दोन गटात राडा झाला आहे. त्यामुळे भाजपमध्ये दोन गट असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा -नवी मुंबईत संघाची नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

जळकोटच्या भाजप पक्ष कार्यालयात भाजपच्या नवीन तालुका अध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक घेण्यात आली. तालुका निवडणूक अधिकारी तथा जिल्हा परिषद सदस्य राहुल केंद्रे, यांच्यावर नवीन अध्यक्ष निवडीची पक्षाने जबाबदारी सोपवली होती. त्यांच्याच उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

जळकोटमध्ये भाजप तालुकाध्यक्ष पदावरून दोन गटात राडा

अध्यक्ष पदासाठी आठ इच्छुक उमेदवारांनी निवडणूक अधिकारी राहुल केंद्रे यांच्याकडे अर्ज केले. त्यानंतर केंद्रे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, मात्र बैठकीत सर्वानुमते ज्या नावाला जास्तीची पसंती होती, त्या नावावर राहुल केंद्रे यांनी सहमती देत तालुका अध्यक्ष म्हणून अरविद नागरगोजे यांचे नाव, तर भाजपचे जिल्हाप्रतिनिधी म्हणून नगरसेवक उस्मान मोमीन यांची निवड केल्याचे जाहीर केले.

हेही वाचा -'...म्हणून भाजपला एरंडेल घेऊन कळवळण्याचा अधिकार नाही'

त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी या निवडीला विरोध करत गोंधळ घातला, तर काही कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले. राहुल केंद्रे यांनी घोषित केलेल्या दोन्ही नावाला माजी आमदार सुधाकर भालेराव यांच्या समर्थकांनी कडाडून विरोध दर्शवत चक्क बैठकीवर बहिष्कार टाकत कार्यालयातून अनेक कार्यकर्ते बाहेर पडले. त्यामुळे तालुका अध्यक्ष निवडीवरून कार्यकर्त्यांचा राडा पाहता भाजपमध्ये दोन गट असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

या बैठकीला जळकोटचे नगराध्यक्ष किसन धुळशेट्टे, ज्येष्ठ कार्यकर्ते सोमेश्वर सोप्पा, मावळते अध्यक्ष बालाजी केंद्रे, विश्वनाथ चाटे, बाळु नंळदवार, संजय गोन्टे, अर्जून वाघमारे, बालाजी सिदगीकर, अनिल नागरगोजे, सत्यवान पाटील, बाबुराव गुट्टे, वैजनाथ केद्रे, गुणवंत गुट्टे, बालाजी मालुसरे, माधव भुरे, माधव मोरे, भागवत सोनटक्के, राजु केंद्रे यासह तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उदगीर विधानसभा निवडणुकीच्या वेळीच भाजपमध्ये दोन गट असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला पराभव पत्करावा लागला असल्याचे तज्ज्ञांकडून वेळोवेळी सांगण्यात आले होते. मात्र, पक्षानी याला कधीच गांभीर्याने घेतले नाही. उलट आमच्यात कसलीच गटबाजी नसल्याचे भाजपकडून सांगितले जात होते. मात्र, आज जळकोट भाजप तालुका अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी दोन गटात झालेला राडा हा जळकोटकरांनी पाहिला आहे.

एक गट बैठकीवर बहिष्कार घालत निघून गेला. त्यानंतर राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित नवीन तालुका अध्यक्ष म्हणून अरविंद नागरगोजे यांचीच निवड करण्यात आली. त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार करून पक्षाच्या कार्यात सदैव आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा विश्वास दिला. मात्र, उदगीर जळकोट मतदारसंघात भाजपचे दोन गट असल्याचे आता भाजपला लपवता येणार नाही. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळू नळदवार यांनीच स्वतः गटबाजीमुळेच माझ्यावर अन्याय झाला असल्याचे सांगितले आहे.

Last Updated : Dec 23, 2019, 12:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details