लातूर - जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागात घोटभर पाण्यासाठी पायपीट करावी लागते. मात्र, औसा येथे भाजपच्या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या ग्रामस्थांची विशेष सोय करण्यात आली होती. सुविधांचा अतिरेकच या कार्यक्रमाला पाहायला मिळाला. मंडपातील प्रत्येक खुर्चीवर पाण्याची बॉटल ठेवण्यात आल्याचे दिसून आले. या लाभ वाटप सोहळ्यात चक्क रिकाम्या खुर्च्यांवरही पाणी बॉटल ठेवल्या होत्या.
घोटभर पाण्यासाठी वणवण करणाऱ्या लातुरात भाजपच्या मंत्र्याकडून पैशाचा अपव्यय - bjp
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा लाभ वाटप सोहळा पार पडला. याकरिता औसा येथील बस डेपो मैदानात भाजपच्या वतीने निधी वाटप सोहळ्याच्या निमित्ताने एक प्रकारे जाहीर सभाच घेण्यात आली.
औसा येथे मंगळवारी तालुक्यातील कामगारांना मदत निधीचे वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकामाचे साहित्य आणि ५ हजार रुपयांची मदत देण्यात आली होती. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा लाभ वाटप सोहळा पार पडला. याकरिता औसा येथील बस डेपो मैदानात भाजपच्या वतीने निधी वाटप सोहळ्याच्या निमित्ताने एक प्रकारे जाहीर सभाच घेण्यात आली.
कार्यक्रम सुरू हण्यापूर्वी या मैदानात ठेवण्यात आलेल्या अडीच हजार खुर्च्यांवर नागरिकांची उपस्थिती नव्हती. तरीही सर्व खुर्च्यांवर पाण्याच्या बाटल्या मात्र ठेवण्यात आल्या होत्या. कार्यक्रम सुरू झाल्यानंतरही हीच अवस्था होती. त्यामुळे घागरभर पाण्यासाठी संबंध शिवारात भटकंती करावी लागत असलेल्या जिल्ह्यात पाण्यावरील अपव्यय होत असल्याचे दिसून आले. एकीकडे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असतानाच लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारे पाण्यासाठी पैशाचा अपव्यय होत असल्याचे चित्र कार्यक्रम ठिकाणी पाहवयास मिळाले.