लातूर - पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याबाबत सोशल मिडीयावर खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध झाल्या आहेत. या प्रकरणी निलंगा तालुक्यातील तिघांविरोधात अदाखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियाचा गैरवापर प्रकरणी हा पहिलाच गुन्हा असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा - लातूर शहर उमेदवारीवरून देशमुख-निलंगेकरांमध्ये रंगला कलगीतुरा
मध्यप्रदेशातील 'हनी ट्रॅप' संदर्भात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे नाव असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासंबंधी गोविंद रामजी शिंगाडे(रा. निलंगा) विजय होगले (रा. खरोसा) दिगंबर पांडूरंग मस्के (रा पानचिंचोली) यांनी फेसबुकवर खोट्या बातम्या आणि आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या होत्या. या प्रकरणी आनंद पुरूषोत्तम अट्टल यांनी शिवाजी नगर ठाण्यात तक्रार नोंद केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोशल मीडियाचा वापर होत असून यावर आळा घालण्याच्या अनुषंगाने ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक लहाने हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
हेही वाचा - लातुरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी; शेकऱ्यांच्या आशा पल्लवीत