लातूर - आडत व्यापाऱ्यांकडून कोट्यवधींचा शेतमाल घेऊन व्यापारी फरार झाला आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील 13 आडत्यांची लाखोंची फसवणूक झाली आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासन योग्य कारवाई करीत नसल्याने सोमवारपासून आडत्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाखोंची उलाढाल होते. दरम्यान, 5 महिन्यापुर्वी काही खरेदीदार व्यापाऱ्यांनी आडत्यांकडून शेती माल घेतला. मात्र, त्याचा मोबदला आडत्यांना दिला नाही. त्यामुळे ८ दिवस येथील बाजार समिती बंद होती. 5 महिन्यात 2 व्यापाऱ्यांनी पैसे अदा केले असले तरी गोवर्धन नरसिंगदास पल्लोड यांच्याकडे १३ व्यापाऱ्यांची थकीत रक्कम कायम होती. या आडत्यांनी शेतकऱ्यांचे पैसे पदरूहून दिले असल्यामुळे हे आडती अडचणीत आले आहेत. तसेच खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांना उचल देणे अशक्य होत आहे.