लातूर -लोकसभेची मतदान प्रक्रिया आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना जिल्ह्यातून मतदानावरील बहिष्काराचे ठरावही वाढत आहे. यामध्ये पिकविमा, पिण्याच्या पाण्याची गैरसोय यासारखे विषय समोर येत आहेत. त्यातच औसा तालुक्यातील बुधोडा येथील ग्रामस्थांनी भूसंपादनाचा मोबदला मिळत नसल्याने बहिष्कार घालण्याचा ठराव ग्रामसभेत घेतला आहे.
मतदानावरील बहिष्काराबाबत बुधोडा ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठराव - लातूर
रत्नागिरी - नागपूर या राष्ट्रीय महामार्गासाठी बुधोडा येथील ८४ घरांचे भुसंपादन होत आहे. मात्र, ६६ कुटूंबांना मोबदला नाकारण्यात आला, तर १८ जणांनाच याचा लाभ झाला आहे. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन या ६६ कुटुंबीयांचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा १८ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा मतदान प्रक्रियेवर सबंध गावकरी बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.
दरवर्षीपेक्षा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासन एक ना अनेक उपक्रम राबवून जनजागृती करीत आहे. दुसरीकडे नागरिकांच्या रोषालाही सामोरे जावे लागत आहे. गतआठवड्यात चाकूर, अहमदपूर येथील शेतकऱ्यांनी पिकविमा रक्कम मिळत नसल्याने या मतदान प्रक्रियेवर बहिष्कार घालण्यासंदर्भात जिल्हााधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. आतापर्यंत अनेक आश्वासने देऊन ही गावे मतदान प्रक्रियेपासून वंचित राहू नयेत, असा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केला आहे. मात्र, बुधोडा येथील ग्रामस्थांनी याबाबत ग्रामसभेतच एकमुखाने ठराव घेतला.
रत्नागिरी - नागपूर या राष्ट्रीय महामार्गासाठी बुधोडा येथील ८४ घरांचे भुसंपादन होत आहे. मात्र, ६६ कुटूंबांना मोबदला नाकारण्यात आला, तर १८ जणांनाच याचा लाभ झाला आहे. मालकी हक्काचे कारण पुढे करीत शासनाने संपादीत घरांच्या जागेचा मोबदला देण्यास नकार दिला आहे. याबाबत शासनाने तातडीने निर्णय घेऊन या ६६ कुटुंबीयांचा प्रश्न मार्गी लावावा. अन्यथा १८ एप्रिलला होणाऱ्या लोकसभा मतदान प्रक्रियेवर सबंध गावकरी बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे.