लातूर -उत्तर प्रदेश येथील हाथरसच्या घटनेचा तीव्र निषेध होत आहे. मंगळवारी लातूर तहसील कार्यालयासमोर ब्लू पँथरच्यावतीने अर्धनग्न आंदोलन करून उत्तरप्रदेश सरकारचा निषेध करण्यात आला. शिवाय त्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
लातुरात ब्लू पँथरचे अर्धनग्न आंदोलन; हाथरसच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी - लातूर ब्लु पँथर संघटना आंदोलन बातमी
पीडितेच्या कुटुंबीयांनादेखील पोलीस संरक्षण देणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशच्या सरकारने त्याअनुषंगाने पावले उचलणे आवश्यक आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सर्वसामान्यांचे जगणेही मुश्किल होईल. त्यामुळे या नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी साधुभाऊ गायकवाड यांनी तहसीलदार यांच्यामार्फत केली आहे.
हाथरस येथील तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. त्यामुळे देशभर संताप व्यक्त होत आहे. मात्र, उत्तरप्रदेश येथील योगी सरकार हे कठोर कारवाई करताना दिसत नाही. शिवाय पीडितेच्या बाबतीत नेमके काय झाले याची माहितीही समोर येऊ देत नाही. या सरकारचा निषेध व्यक्त करीत मुख्यमंत्री योगी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हे प्रकरण त्वरित मार्गी लावून पीडितेच्या कुटुंबीयांनादेखील पोलीस संरक्षण देणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशच्या सरकारने त्याअनुषंगाने पावले उचलणे आवश्यक आहे. अशीच परिस्थिती राहिली तर सर्वसामान्यांचे जगणेही मुश्किल होईल. त्यामुळे या नराधमांना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी साधुभाऊ गायकवाड यांनी तहसीलदार यांच्यामार्फत केली आहे. आंदोलनात पँथर संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.