महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विकासाचा मुद्दा नसल्याने भाजप भयभीत - सचिन पायलट - agenda

लोकशाहीला बळकट करण्यासाठी आणि हुकूमशाहीला हद्दपार करण्याची गरज निर्माण झाली आहे. २३ मे रोजी केंद्रात आणि ६ महिन्यांनी राज्यातील चित्र बदलेल असा विश्वास राज्यस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केला.

सचिन पायलट

By

Published : Apr 10, 2019, 12:08 PM IST

लातूर - भाजपकडे विकासाचा मुद्दा नाही. त्यामुळे देशाच्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांना पुढे करुन ते मतदारांसमोर जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सैनिकांचा आणि धर्माचा मुद्दा घेऊन मतदारांसमोर जाऊ नका असे ठणकावले असतानाही भाजप याचा भावनिक मुद्दा करीत आहे. विकासाचा मुद्दा नसलेली भाजपा भयभीत झाली असल्यानेच अशी पळवाट शोधत आहे. मात्र, मतदार जागृत झाला असून त्यांना या निवडणुकीत जागा दाखवून देईल असा विश्वास राज्यस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी व्यक्त केला.

लातूर : माध्यमांशी संवाद साधताना सचिन पायलट

मंगळवारी रात्री सभास्थळी येण्यास उशीर झाल्याने केवळ १० मिनिटांमध्ये त्यांना आपले भाषण उरकते घ्यावे लागले. वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या याबाबत बोलण्यास मोदी सरकार तयार नाही. ते धर्म व सैनिकांचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जात आहे हे दुर्दैव आहे. केंद्रात आणि राज्यात बहुमत मिळाले असतानाही जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. उलटार्थी अन्यायकारक वागणूक मिळाल्याने यंदाच्या निवडणुकांमध्ये त्यांना जागा दाखवून दिली जाईल. लातूर हा काँग्रेसचा गड होता आहे आणि मतदारांच्या आशीर्वादाने तो राहिलही यामध्ये दुमत नसल्याचेही पायलट यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details