लातूर -जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अंतर्गत गटबाजीचा फटका भाजपला होणार का ? असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र, पक्षश्रेष्ठींनी या निवडीकडे लक्ष दिले असल्याने अंतर्गत गटबाजीवर अंकुश घालण्यास पक्षाला यश मिळाले आहे. लातूर जिल्हा परिषेदेत अखेर भाजपला सत्ता कायम ठेवण्यामध्ये यश मिळाले आहे. प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या निवडीत भाजपच्या राहुल केंद्रे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी भारतबाई सोळंके यांची निवड झाली आहे.
हेही वाचा... पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा 'भडका'; मुंबईत पेट्रोल ८१.२८ रुपये/लिटर
एकूण ५७ सदस्य असलेल्या लातूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाची निवड सोमवारी यशवंतराव सभागृहात पार पडली. सत्तांतरच्या उद्देशाने संख्याबळ कमी असतानाही काँग्रेसचे उमेदवार अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये होते. सोनाली थोरमोटे यांनी अध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, भाजपचे ३५ सदस्य आणि आघाडीचे १९, शिवसेना ०१, अपक्ष २ असे संख्याबळ असल्याने काँग्रेसला विजय खेचता आला नाही.