लातूर - जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले. औसा तालुक्यातील तर सात महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानंतर पीक विमा भरलाही होता. मात्र, दोन दिवसातच कागदपत्रे जमा करण्याची मुदत दिल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. विम्याची कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करत औसा येथे शेतकऱ्यांनी ठिय्या दिला.
कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या, पीकविम्यासाठी मुदत वाढविण्याची मागणी - औसा पीकविमा मुदतवाढ शेतकरी आंदोलन बातमी
विम्याच्या नुकसान भरपाई बाबतीत अन्य कठोर निकष लावले असून सरसकटपणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुधवारी कृषी कार्यालय सुरू होताच शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केला. जोपर्यंत विम्याची कागदपत्रे स्वीकारुन नुकसान भरपाई दिली जाणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. दुपारी 4 पर्यंत ठिय्या आंदोलन हे सुरूच होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात सोयाबिन पीक मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाते. पावसामुळे सोयाबिन मूग व उडीद पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता. सध्या प्रशासनाने पीक विमा भरलेली कागदपत्रे व अन्य इतर कागदपत्रे कृषी कार्यालयात सादर करण्यासाठी केवळ दोन दिवसांची मुद्द्त दिली होती. याबाबतीत अनेक शेतकऱ्यांना माहिती नसल्याने कागदपत्रे जमा करू शकले नाहीत. याबाबतीत विमा कंपनीच्या वतीने मुदत वाढवून दिली नाही. विम्याच्या नुकसान भरपाई बाबतीत अन्य कठोर निकष लावले असून सरसकटपणे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुधवारी कृषी कार्यालय सुरू होताच शेतकऱ्यांनी कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केला. जोपर्यंत विम्याची कागदपत्रे स्वीकारुन नुकसान भरपाई दिली जाणार नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. दुपारी 4 पर्यंत ठिय्या आंदोलन हे सुरूच होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून निर्णय घेतला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.