महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राजकारणातल्या 'संधी'वरून अमित देशमुख-अशोक चव्हाणांमध्ये जुगलबंदी - CHANCE

राजकारणातल्या 'संधी'वरून आमदार अमित देशमुख आणि अशोक चव्हाणांमध्ये रंगली जुगलबंदी... विलासरावांप्रमाणे अशोक चव्हाणही राहणार अमित देशमुखांच्या पाठीशी.... जिल्ह्यासह महाराष्ट्रातही फिरण्याचे चव्हाणांनी केले आवाहन

अमित देशमुख-अशोक चव्हाण

By

Published : Feb 24, 2019, 8:53 PM IST

लातूर- शहरात आज राजकारणात मिळणाऱ्या संधीवरून आमदार अमित देशमुख आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात रंगलेली जुगलबंदी कार्यकर्त्यांना पाहायला मिळाली. मिळालेल्या संधी कशा प्रकारे महत्वाच्या आणि परिणामकारक ठरतात, हे सांगत असताना आमदार अमित देशमुख यांनी अशोक चव्हाण यांना राजकारणात त्यांच्यासह इतर तरुणांना संधी देण्याचे आवाहन केले. यावर चव्हाण यांनीही आपल्या खास शैलीत देशमुख यांच्या मुद्याला स्पर्श करून मोठ्या भावाप्रमाणे कायम पाठीशी राहणार असल्याचे सांगितले.

अमित देशमुख-अशोक चव्हाण


अमित देशमुखाच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभे राहणार-


देशमुखांनी केलेल्या संधीच्या विश्लेषणाचा धागा पकडत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही मनाचा मोठेपणा दाखवला आणि नवीन पिढीलाच अधिक संधी दिली जाणार असल्याचे सांगितले. यामुळे अमित देशमुख यांनी केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाष्ट्रात फिरणे आवश्यक आहे. त्यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभा राहणार असल्याचा त्यांनी यावेळी शब्द दिला. संधीवरून निर्माण झालेल्या या जुगलबंदीची चांगलीच चर्चा रंगल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details