लातूर- औसा शहरालगत असलेल्या महाविद्यालायासमोर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. शनिवारी अजिम महाविद्यालयासमोर दुचाकीचा अपघात झाल्याने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे येथे बोगदा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
लातूर : वाढत्या अपघातामुळे विद्यार्थ्यांवर आंदोलनाची वेळ
शनिवारी औसा शहरालगत असलेल्या अजिम महाविद्यालयासमोर दुचाकीचा अपघात झाल्याने एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे येथे बोगदा करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.
अजिम महाविद्यालयासमोर राष्ट्रीय महामार्ग 361 चे काम सुरू आहे. या महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी ग्रामीण भागासह शहरातून शिक्षणासाठी येतात. विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून महाविद्यालयात प्रवेश करावा लागतो. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या रोडवर दोन्ही बाजुंनी महाविद्यालये असल्याने व कार्यालय दुसऱ्या महाविद्यालयात असल्याने विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते.
त्यामुळे नागरसोगा रस्त्यावर असलेला बोगदा या महाविद्यालयात शिकनाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दुर पडतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडून ये-जा करावी लागत असल्याने विद्यार्थ्यांसह प्राध्याकपकांची गैरसोय होते. महाविद्यालया समोर बोगदा सोडावा अशी मागणी या आंदोलनात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी केली आहे.