लातूर - चाकूर शहरालगतच लातूर-नांदेड महामार्गावर एका दुकानासमोर 28 वर्षीय तरुणाचा मृतदेह मंगळवारी (दि. 7 जुलै) सकाळी निदर्शनास आला होता. तीक्ष्ण हत्याऱ्याने लातूर शहरातील गॅस एजन्सीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा खून झाला होता. त्यानंतर अवघ्या तिसऱ्याच दिवशी (दि. 10 जुलै) पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. मित्रानेच मित्राचा काटा काढला असल्याचे समोर आले आहे.
प्रभाकर गोविंद सोळुंके (वय 28 वर्षे) हा लातूर शहरातील एका गॅस एजन्सीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करीत होता. मंगळवारी सकाळी चाकूर शहरालगत त्याचा मृतदेह आढळून आला होता. तीक्ष्ण हत्याऱ्याने त्याच्या चेहऱ्यावर वार केले होते. मोबाईल कॉल डिटेल्सवरुन या खुनाचा छडा लावण्यास पोलिसांना यश आले.
शुक्रवारी (दि. 10 जुलै) सकाळी अहमदपूर तालुक्यातील लांजी येथून धनराज सुधाकर आगलावे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय गुन्ह्यात वारलेली दुचाकीही जप्त पोलिसांनी जप्त केली आहे.